प्रशासनाकडून ५० दिवसांचा लेखी अवधी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत

प्रशासनाकडून ५० दिवसांचा लेखी अवधी; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापुरात पाण्यासाठी रणकंदन! ३८ वर्षांच्या अन्यायाविरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर!”१५ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नवयुवकाना मिळेनात मुली!” संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली रिकामी घागर.प्रशासनाकडून ५० दिवसांचा लेखी अवधी; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत.आंदोलनात महिला सुद्धा आक्रमक बुलढाना जिल्ह्यातील मलकापूर शहरात गेल्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाई विरुद्ध आज दिनांक 16 जून रोजी नूतन विद्यालय ते नगर पालिका पर्यंत वाजत गाजत नारे बाजी करत आंदोलन समाज सेवक ओम शिंदे आणि इतर समाज सेवकांच्या आयोजन काढण्यात आले नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला. “१५ दिवसांआड पाणी मिळत असल्याने आमच्या तरुणांची लग्ने रखडली आहेत, त्यांना मुली मिळेनात,” असा खळबळजनक आरोप करत आज हजारो नागरिकांनी नगरपरिषदेवर थेट हल्लाबोल केला. नियमित कर भरणाऱ्या पाणी नाही आणि नगरपालिका हद्दी बाहेरील वस्त्या मध्ये नवीन पाईप लाइन टाकून वाढीव पाणी पुरवठा केल्या मुळे आंदोलन आक्रमक झाले शेकडो नागरिकांचा एल्गार: १९८८ पासून ते थेट २०२६ पर्यंत पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मलकापूरकरांनी प्रशासनाविरुद्ध ‘आरपारची लढाई’ सुरू केली आहे. आज शहरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.महिलांचा घागर मोर्चा: आंदोलनात संतप्त महिलांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून, त्यांच्या हातात ‘रिकामी घागर’ देऊन प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. वाढता जनक्षोभ पाहता शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.*प्रमुख मागण्या आणि इशारा:* १० ते १४ दिवसांचा पाण्याचा वनवास संपवून पाणीपुरवठा ६ दिवसांवर आणावा, अवैध कनेक्शनवर सर्जिकल स्ट्राईक करावा आणि अमृत योजनेचा निधी शहरासाठीच वापरावा, जो पर्यंत शहर वासियांना मुबलक पाणी मिळत नाही तो पर्यंत नगरपालिका हद्दी बाहेर पाणी नाही अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली. या लढ्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत घेण्यात आली आहे.अखेर प्रशासन नमले: परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची माफी मागत, प्रश्न सोडवण्यासाठी ‘५० दिवसांचा अवधी’ मागितला. प्रशासनाने ठोस उपाययोजनांचे ‘लेखी आश्वासन’ दिल्यानंतरच हे जनआंदोलन शांत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *