जळगाव जामोद (खांडवी ) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन संपन्न

जळगाव जामोद (खांडवी ) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन संपन्न.

जळगाव जामोद प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे युवा नेतृत्व रोहितदादा पवार यांचे शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात पंढरपुर येथे 12/6/2026 पासुन बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीच्या जीआर मध्ये 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याना वगळण्यात आले आहे. यामुळे लाखों शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित राहणार आहेत. 2024 च्या विधानसभेत देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याचा सातबारा कोरा करुन संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.परंतु आता काढलेल्या कर्जमाफीच्या जीआर मध्ये हे भाजपा सरकार शेतकऱ्याची फसवणुक करीत असल्याचे उघड़ झाले आहे. जीआर जाचक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून तसेच शेतकऱ्याची फसवनुक करनाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज दिनांक 14/6/2026 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटिल, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ,करीम खान,महादेव भालतडक, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, सिद्धार्थ हेलोड़े,सुभाष कोकाटे,विठ्ठल वाघ, अंबादास सारोकार,पंजाब वाघ, राम पारस्कार, संतोष जवरे, सलीम खान, रत्नाकर मानकर, गजानन चतारे, भिका वानखड़े, अरुण बावस्कार, जय कागदे, डिगांबर तिजारे, सुनिल तायडे, मिर्जा खान, अविनाश गावंडे, सुहास वाघ, पवन वाघ,विठ्ठल अवचार,कैलास मानकर, योगेश भीसे, विशाल वाघ, प्रकाश पारस्कार, गजानन चंभारे,विनोद खूपसे, प्रमोद गई यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *