वादळीवाऱ्यामुळे घर उद्ध्वस्त राजू वानखडे यांचा संसार ध्वस्त कोयाळी बु. येथील घटना

वादळीवाऱ्यामुळे घर उद्ध्वस्त राजू वानखडे यांचा संसार ध्वस्त कोयाळी बु. येथील घटना

वाशिम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

शुक्रवारी सायंकाळी झालेल्या च्या वादळी वाऱ्याने रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील गावात प्रचंड नुकसान झाले आहे, अल्पभूधारक शेतकरी राजू महादू वानखडे यांचे संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. त्यांचा संसार ध्वस्त झाला आहे.
या सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की घरावरील 40 पत्रे उडून गेली आणि घरातील साठवलेला 20 पोते गहू पूर्णपणे भिजून खराब झाला.
राजू महादू वानखडे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्याच उत्पन्नावर ते पत्नीसमवेत गुजराण करतात. काल रात्री आलेल्या थैमान वाऱ्याने त्यांच्या घराचे छप्परच उडवले. एकही पत्र शिल्लक राहिले नाही. घरात साठवून ठेवलेला वर्षभराचा गहू पावसात भिजून पूर्णपणे खराब झाला. वानखडे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्याकडे दुसरी कोणतीही शेती नाही. हेच दोन एकर आणि हेच धान्य आमचा आधार होता. आता घरावर छप्पर नाही, खायला धान्य नाही. प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी हात जोडून विनंती केली आहे. असे अश्रू अनावर होऊन राजू वानखडे म्हणाले. त्यांच्या पत्नीनेही सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना तात्काळ पंचनामा करूनै नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कोयाळी बु. सह परिसरातील शेतकऱ्यांची पिकेही वाऱ्याने झोडपली आहेत. ग्रामस्थांनी वानखडे कुटुंबाचे सांत्वन केले आहे, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *