गोपाल गवळी यांची मालेगाव -शिरपूर मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

गोपाल गवळी यांची मालेगाव -शिरपूर मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालेगाव-शिरपूर मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी अमानी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गोपाल गवळी यांची निवड करण्यात आली आहे, नुकतेच वाशिम येथील महेश भवन येथे भाजपा अधिकाऱ्याची सभा संपन्न झाली , यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलागे , वाशिम मतदार संघाचे आमदार श्याम भाऊ खोडे , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप देशमुख, मालेगाव भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश मुंडे, गणेश कुटे भाजपा तालुकाध्यक्ष , यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली होती,ही निवड झाल्याबद्दल पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मला या पदापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.असे गोपाल गवळी यांनी

सांगुनआपण माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे व संघटनेच्या हितासाठी पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आपल्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन.असे सांगितले,कार्यक्रमाला तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित लाभली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *