मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मेडीशन औषधांचा तुटवडा ? रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना औषध मेडिसिन मिळालेच पाहिजे–जाधव यांची मागणी

मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मेडीशन,औषधांचा तुटवडा ?रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना औषध मेडिसिन मिळालेच पाहिजे–जाधव यांची मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि.३० :-शहरातील असलेल्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात औषध मेडिसिन उपलब्ध नसल्याने रुग्णांना अर्धवटच मेडिसिन घेऊनच परत घरी जाने भाग पडले असल्याचे चित्र आज ३० मे रोजी पाहण्यास मिळाले, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी संबंधित उपस्थित असलेले डॉ जाधव यांना याबाबत चौकशी केली असता, ठीक आहे म्हणत काही मेडिसिन्स संपली असेल आल्यानंतर आम्ही देऊ असे सांगण्यात आले, अधिक माहिती तुम्हाला याबाबत विचारायचे असल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा असे म्हटले, संबंधित मेडिसिन वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यास याबाबत विचारले असता स्टोररूमची चाबी डॉ साहेबांकडे आहे साहेब आजारी असल्यामुळे आज आले नाहीत सोमवारी येऊन औषध घेऊन जाणे असे सांगण्यात आले, असा कारभार ग्रामीण रुग्णालय आज पाहण्यास

मिळाला खेड्यापाड्यावरून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण आपले आजाराची तपासणी करण्यासाठी शासनाच्या या सरकारी दवाखान्यात येत असतात परंतु त्यांचं समाधान न झाल्यास त्यांनी कोणाकडे जायचं असा प्रश्न उपस्थित झालाय ? रुग्णाची अपेक्षाच काय असते त्यांचा समाधान झाला पाहिजे चांगले व्यवस्थित बोललं गेल पाहिजे मेडिसिन औषधी मिळाले पाहिजे, अशीच अपेक्षा असते , गोरगरीब व सर्वच रुग्णांना औषध मेडिसिन उपलब्ध करून वेळेवरच मिळाले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी याप्रसंगी डॉक्टरला बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *