
मालेगावकरांच्या प्रेमाची परतफेड शहराचा विकास करणारआ. भावनाताई गवळी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
वाढदिवस इतक्या मोठ्या स्वरूपात साजरा करून तुम्ही जे प्रेम माझ्या प्रति व्यक्त केले हे मालेगांव वासीयांचे प्रेम बघुन मी भाराऊन गेले असुन या प्रेमाची परतफेड शहराचा तसेच तालुक्याचा कधी नव्हे इतका विकास करून करणार आहे. मालेगाव नगरपंचायत च्या माध्यमातून यापूर्वी मी करोडो रुपयांची कामे शहरात केली असून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारचे आश्वासन आमदार भावनाताईमाझा गवळी यांनी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मालेगाव येथे बोलताना व्यक्त केलेअपराजित खासदार तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांचा २७ मे रोजी मालेगाव येथील बालाजी लॉन मध्ये नगरपंचायत तथा शिवसेना तालुका व शहराच्या वतीने, अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आ गवळी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त माजी सैनिक

तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने वॉटरबॅग चे वाटप करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे हार घालून स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी फटाक्याच्या आतिषबाजीचा जल्लोषकरण्यात आला होता. आमदार भावनाताई गवळी यांचा भव्य दिव्य सत्कार नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष सौ राधाताई महादेव खवले यांच्यासह सर्व सभापती नगरसेवक तसेच शिवसेनेचेव सर्व पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते आमदार भावनाताईंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदराव मेडशिकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुटे, नगराध्यक्ष ओम खुरसडे, उपाध्यक्ष राधाताई खवले पाटील, जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, सेवा सहकारी सोसायटी माजी अध्यक्ष रामदास काटेकर, संदीप ताजणे यांच्यासह तालुक्यातील जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी महिला व नागरिक आदी मान्यवरांची मोठ्यासंखेने उपस्थिती लाभली होती, कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला, याप्रसंगी आ. भावनाताई गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानून शहराचा तसाच मालेगाव रिसोड मतदार संघाचा विकास कामे करण्यास मी कधी कमी पडणार नसल्याचे सांगितले. प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदीप मोरे, तर आभार तालुका प्रमुख प्रदीप कुटे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी नगराध्यक्ष ओम प्रकाश कुरसडे तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील कुठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
