
नीट पेपरफुटी: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ.; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
NEET-UG 2026 चा पेपर फुटल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या पेपरफुटीमुळे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, NEET ची फेरपरीक्षा विनामूल्य घ्यावी आणि Public Examinations Act 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष अभिषेक सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, “पेपरफुटीमुळे सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फिरले आहे. देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे,” असा आरोप करण्यात आला. निवेदनामध्ये नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.NEET ची फेरपरीक्षा घेण्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे व ही परीक्षा पूर्णपणे

विनामूल्य घ्यावी. Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय अॅड. प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष महेश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाल्याचे सपकाळ यांनी सांगितले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ याकडे लक्ष घालून कार्यवाही करावी अशा पद्धतीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी वाशिम यांना दिले आहे, यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य किरण गिरे, जिल्हा महासचिव सम्यक विद्यार्थी भगवान ढोले, अक्षय सपकाळ, आकाश पंडित, सूर्यकांत गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष, प्रतीक पाईकराव , स्वप्निल खंदळे आदी उपस्थित होते.
