पांगरी नवघरे सर्कल मध्ये घर गणना मोहिमेला प्रारंभ

पांगरी नवघरे सर्कल मध्ये घर गणना मोहिमेला प्रारंभ

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

केंद्र शासनाच्यामार्गदर्शक सूचनांनुसार देशभर राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घर गणना मोहिमेला मालेगांव तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावात अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम १६ मे ते १४ जून दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती अमानीचे चार्ज जनगणना पर्येंवेक्षक तथा ग्राम महसूल अधिकारी जगन्नाथ महाले यांनी दिली प्रशासनाने जनगणना प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक नियोजन केले असून, ग्रामीण भागात एकूण हाऊस लिस्टिंग ब्लॉक निश्चिवत करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी अमानी येथे ४ प्रगणक यामध्ये प्रतिभा इंगळे मॅडम, आशा मापारी मॅडम व रेखा डाबेराव मॅडम तसेच सीमा पाठक मॅडम हे प्रगणक म्हणून काम पाहत असून अमानी व भेरा येथे पर्यवेक्षक म्हणून जगन महाले ग्राम महसुल अधिकारी, अमानी )यांचीनियुक्ती करण्यात आली आहे. सर्कल मध्ये प्रत्येक गावात वेगवेगळे प्रगणक निवड

करण्यात आली आहे, नियुक्त कर्मचारी प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करीत आहेत. यंदाच्या जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, मोबाईल ॲप आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती संकलन होणार आहे. नागरिकांना स्व-गणना करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीने स्व-गणना पूर्ण केलेल्या कुटुंबांनी त्यांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जनगणना कायदा १९४८ अंतर्गत नागरिकांनी खरी व अचूक माहिती देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, तिचा वापर कोणत्याही कर आकारणीकिंवा चौकशीसाठी केला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच जाणीवपूर्वक चुकीची माहिती देणे किंवा माहिती देण्यास नकार देणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. जनगणनाचे पर्यवेक्षक महाले तसेच शिवसेना पक्षाचे बिएलो तथा अमानी बुथ केंद्रप्रमुख सामाजिक कार्यकर्ती उषा जाधव यांनी नागरिकांना प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन जनगणना मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *