
देवधाबा येथील झुकलेले खांब सुरळीत करून विद्युत पुरवठा सुरू करा शिवसेना (उबाठा) चे वीज वितरण कंपनीला निवेदन; आंदोलनाचा इशारा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
देवधाबा येथील स्मशान भुमीजळील विनोद पाचपोळ डि.पी. चे पोल झुकल्याने विद्युत पुरवठा महिनाभरापासून खंडीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन दिवसांत पोल सरळ करून विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला.तालुक्यातील देवदाबा येथील स्मशानभूमी जवळील विनोद पाचपोळ डीपी वरील पोल झुकल्याने या पोल वरील विद्युत पुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचे पिके जळत आहेत. सद्यस्थिती पेरणीचे दिवस असून विहिरीत पाणी उपलब्ध असूनहीविद्युत पुरवठा खंडित असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. याबाबत म.रा.वि.वि. कंपनीला संबंधित शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा लेखी व तोंडी तक्रारी करून सुध्दा म.रा.वि.वि. कंपनीने दुर्लक्ष केल्याने याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने आज २५ मे रोजी देवधाबा येथील शेतकऱ्यांसह उपकार्यकारी अभियंता खान यांचे कार्यालय गाठून त्यांना याबाबत निवेदन देऊन दोन

दिवसातआस्थापनादेवधाबा येथील शेतकऱ्यांचे काम मार्गी न लागल्यास कंपनी कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा गजानन ठोसर यांनी दिला आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, अतुल बाजोळे, नामदेव माळी, ऋत्विक सोनवणे, नरेंद्र बोरसे, शिवप्रसाद निळे, प्रतीक माळी, एकनाथ सपकाळ, संजीव सोनवणे, एकनाथ माळी, राहुल बोरसे, गजानन बोरसे, संजय बोरसे, ईश्वर बोरसे सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नमूद आहे.
