
सूर्य आग ओकतोय,उष्णतेचा कहर; तापमान ४२ अंशाच्या पार
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
तालुक्यात गेल्याकाही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून, आज १९ मे रोजी परिसरात तापमानाने तब्बल ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाने अत्यंत भीषण स्वरूप धारण केले असून, या विक्रमी तापमानामुळे संपूर्ण मालेगाव तालुका अक्षरशः होरपळून निघाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळेत शहरातील रस्ते, ? दुपारच्या वेळी ओस पडू लागले आहे, ? सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी तर सूर्य आग ओकत असल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्ते अक्षरशः ओस पडत असल्याचे चित्र आहे. नागरिकांकडून बचावासाठी सुती कपडे, स्कार्फ, गॉगल्स आणि थंड पेयांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. उष्णतेपासून रुग्णालयांमध्ये उष्णतेचा त्रासामुळे होणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा (सनस्ट्रोक) धोका कमालीचा वाढला आहे. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. स्थानिक रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन, चक्कर येणे, ताप आणि उलट्या अशा त्रासांमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि पोटा पाण्या साठी उन्हातानात काम करणाऱ्या मजूर

वर्गाला या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. वाढती उष्णता केवळ मानवी आरोग्या साठीच नव्हे, तर तालुक्याच्या शेतीसाठी आणि जलसाठ्यासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. कडक उन्हामुळे तालुक्यातील पाण्याचे मुख्य स्त्रोत आणि जलसाठे झपाट्याने आटत चालले आहेत. परिणामी, ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना दुपारी जास्त वेळ उन्हात न थांबण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.
