SIR मॅपिंग पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासन सज्ज

SIR मॅपिंग पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासन सज्ज

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून देशभरात एस आय आर मॅपिंग चे काम बीएलओ मार्फत सुरू आहे. या कामाला गतीने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासन सरसावले असून शिरपूर येथील २० टक्के बाकी असलेले एस आय आर मॅपिंग काम तात्काळ पूर्व करण्याच्या सूचना शिरपूर ग्रामपंचायत मधील आढावा बैठकीमध्ये मालेगाव निवडणूक अधिकारी सुनील देशमुख यांनी दिल्या. देशात विविध ठिकाणी सध्या एस आय आर मॅपिंग चे काम सुरू आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे सुद्धा बी एल ओ मार्फत एस आय आर मॅपिंग काम सुरू आहे.१४५०४ मतदार असलेल्या शिरपूर येथील ८० टक्के मतदारांचे एस आय आर मॅपिंग काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २०% एस आय आर मॅपिंग साठी बीएलओ येणाऱ्या अडचणी संदर्भात एस डी ओ वैशाली देवकर मॅडम यांच्या सूचना वरून मालेगाव निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार सुनील देशमुख आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये बी एल ओ यांना येणाऱ्या अडचणी ऐकून घेऊन गावातील व्यक्तींच्या सहकार्याने बी एल ओ यांनी उर्वरित २० टक्के एस आय आर मॅपिंगचे काम गतीने पूर्ण करावे अशा सूचना दिल्या. एकंदरीत प्रशासन एस आर आय मॅपिंग साठी सरसावले असल्याचे चित्र बैठकीमध्ये पहावयास मिळाले.

या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य कलीमभाई रेघीवाले, गणेश अंभोरे, शंकर वाघ यांच्या सह तलाठी गणेश गवळी, अमोल भुरकाडे, भगवान वाघ तसेच बीएलओ पर्यवेक्षक असद पठाण, बि एल ओ दिपक भालेराव, मो शाहिद इकबाल, किशोर वाघ,शे जुबेर शे इब्राहिम,मो इलियास अझीमोददीन, शे महेबुब शे बन्नु,मो शाकीर मो मुख्तार, रामेश्वर सर्जेराव, भगवान बोंडे, दिलीप तागड, सागर बांदे, सिध्दार्थ ढोले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *