कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयात बायर कंपनी तर्फे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन

कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयात बायर कंपनी तर्फे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन

प्रतिनिधी जळगाव जामोद:

स्थानिक सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय येथे “बायर क्रॉप सायन्स लिमिटेड (Bayer Crop Science Ltd)” या जागतिक कीर्तीच्या नामांकित कंपनीद्वारे कॅम्पस ड्राईव्हचे दि.०८/०५/२०२६ रोजी उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतींद्वारे पात्र विद्यार्थ्यांची ‘फिल्ड ऑफिसर’ या पदासाठी व इंटर्नशिपसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.तांत्रिक आणि व्यक्तिगत मुलाखतीसाठी कृषि व उद्यानविद्या महाविद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अंतिम निकालानंतर कंपनीतर्फे ६ विद्यार्थ्यांची फिल्ड ऑफिसर या पदासाठी निवड करण्यात आली. तसेच

इंटर्नशिप करिता अंतिम वर्षातील (सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेले) एकुण १५ विद्यार्थ्यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे.कृषि आधारित नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रिय कंपन्यांमध्ये करियर संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयातील तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना घडविल्या जात आहे व अशा प्रकारे कृषी क्षेत्रातील अनेक संधी भविष्यात महाविद्यालयाकडून निर्माण केल्या जातील आणि सर्व विद्यार्थ्यांनी अशा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी केले. महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्यासाठी सतत प्रोत्साहित करण्यात येते. अशाप्रकारे बहुविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातर्फे राबवण्यात येतात, यामुळेच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होत आहे, असे मनोगत कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.या कॅम्पस प्लेसमेंटसाठी बायर क्रॉप सायन्स कंपनीतर्फे टेरिटरी मॅनेजर श्री.सागर पारसकर, श्री.प्रशांत पाटील, श्री.अजय जाधव आणि श्री.गौरव काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि वैयक्तिक मुलाखती घेतल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.मुलाखतींच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.चंद्रशेखर भोपळे, प्रा.वैभव जाधव, तसेच प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, प्रा.अमोल चोपडे आणि प्रा.प्रमोद डव्हळे यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय प्रशासन तसेच सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, उपाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब इंगळे, कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नितीन सातव व पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *