
मलकापूर शहरातील व न प हद्दीबाहेर अवैध टाकलेल्या पाईपलाईन बंद करण्याची मागणी
प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर
शहराला धोपेश्वर येथून पाणीपुरवठाकेला जातो पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना सुद्धा आज रोजी शहराला १४ ते १५ दिवसापासून पाणीपुरवठा एकदा होत असून तेही अशुद्ध स्वरूपाचा आहे.मलकापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा महिन्यात केवळ दोनदा होत असताना सुद्धा नगरपरिषद हद्दीच्या बाहेरील मुस्लिम कॉलनी वस्तींमध्ये अवैदीच्या मलकापूर नगर परिषदेची पाईप लाईन टाकून तेथे पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. मलकापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याचा टंचाईचा सामना करावा लागत असताना पाणीपुरवठ्याचेकोणतेच नियोजन नसताना नगरपरिषद हद्दीबाहेरील नागरिकांना अवैध पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करणे म्हणजेच नियमित पाणीपट्टी व कर भरणारा करणाऱ्या नागरिकांवर एक

प्रकारचा अन्याय होत आहे. मलकापूर शहर भाजपा व शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देत असून, रोहित कनेक्शन बंद करण्यात यावे व शहरातील लोकांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद ची राहील असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले
