गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार महाविद्यालयाची अभिनव परंपरा

गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार; महाविद्यालयाची अभिनव परंपरा

जळगाव (जामोद) प्रतिनिधी

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव (जामोद) येथील एच एस सी बोर्ड परीक्षा 2026 (इयत्ता १२ वी) प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांच्या गावी व घरी जाऊन सत्कार करत अनोखी परंपरा यंदाही जपली.वाणिज्य शाखेत कु. कोमल श्रीकृष्ण नळकांडे हिने प्रथम क्रमांक मिळविला असून कु. नम्रता प्रल्हाद कराळे द्वितीय, तर कु. स्नेहा गोपाल गिऱ्हे व कु. कल्याणी गोपाल वानखडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत कु. सरला देविदास वाघ प्रथम, कु. वैष्णवी शिवशंकर रोहनकार द्वितीय, तर कु. दिव्या गणेश अहिर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सावरगाव,पळसखेड,वकाना,काजेगाव व आसलगाव या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान केला. या प्रसंगी

विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करण्यात आले.या छोटेखानी सत्कार सोहळ्यानंतर विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी महाविद्यालयातील शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे मनापासून कौतुक केले. काही विद्यार्थीनी व पालक या कौतुकामुळे भावुक झाले. विद्यार्थ्यांच्या यशामागे महाविद्यालयाचे प्रशासन, शिस्त व प्राध्यापकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे पालकांनी सांगितले.गावातील नागरिकांनीही प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केलेला सन्मान ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नवी ऊर्जा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.शेवटी विद्यार्थ्यांना “प्रयत्न, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्यामुळेच यश मिळते” असा संदेश देण्यात आला.महाविद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *