
पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्या बद्दल ठाणेदार राजेश खेरडे यांचा सत्कार
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
ठाणेदार राजेश खेरडे यांना १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिम येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह पदकाने गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मालेगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते रवी बळी तसेच श्री दिगंबर जैन महासमितीचे मीडिया प्रमुख विनोद रोकडे (जैन) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन खेरडे यांचा सत्कार करण्यात आला. राजेश खेरडे यांनी पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

