
आज मालेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ समाधान शिबिर
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
राजस्व प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन ८ मे रोजी सकाळी मालेगाव तहसील कार्यालय येथील मीटिंग हॉलमध्ये वाशीम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या समाधान शिबिरामध्ये नागरिकांची प्रलंबित महसुली कामे मार्गी लावली जाणार आहेत.

तसेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात येणार आहे. एकाच छताखाली प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देऊन जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदाररंजना गोरे,महसूल नायब तहसीलदार अरविंद करांगळे, निवडणूक नायब तहसीलदार सुनिल देशमुख, पुरवठा निरीक्षण अधिकारी बळीराम वांजोळ यांच्यासह महसूल मंडळाचे सर्व अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.तरी, नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या कामांचे निराकरण करून घ्यावे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
