
अवघ्या १६८ लोकसंखेच्या गावाच्या सौ. सुशीला शेषराव गोटे मोठ्या गट ग्रा.पं.च्या थेट सरपंच ! सरपंच पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्येसर्वात कमी लोकसंख्येच्या विविध कारणांनी रिक्त झालेल्या थेट सरपंच गावातुन थेट सरपंच होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
ता. ३० ;-नगरा-महानगरातील सर्वसाधारण फ्लॅट पेक्षाही कमी लोकसंख्या म्हणजे २०११च्या जनगणनेनुसार अवघी १६८ लोकसंख्या असलेल्या ब्राह्मणवाडा (ता. मालेगाव) च्या सौ. सुशिलाताई शेषराव गोटे ह्या तब्बल तीन गावांची मोठी गट ग्रामपंचायत असलेल्या शेलगाव बोंदाडेच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शेलगाव (ओंकारगीर), ब्राह्मणवाडा बु. ब्राह्मणवाडा खु. ह्या तिन्ही गावांच्या गावकऱ्यांनी केलेल्या भरघोष मतदानाने निवडून आल्या आहेत. ब्राह्मणवाडा खुर्द हे एवढे लहान गाव आहे की, तेथे शाळांचं काय साधी अंगणवाडी सुद्धा नाही आहे एवढ्या छोट्या गावातून तीन गावांच्या गट ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदी चक्क पोटनिवडणुकीत महीला निवडून येण्याचा कदाचित महाराष्ट्रातील हा विक्रम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशीम जिल्ह्यात ह्यावेळी एप्रिल महिन्यातआणि ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता निवडणुका घेण्यात आल्या यामध्ये मंगळवारी २८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर बुधवारी (दि.२९) निवडणूक निकाल घोषित झालेत. या निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये मालेगाव तालुक्यातील शेलगाव (बोंदाडे) जे गाव प.पु. संत ओंकारगीर बाबा यांचे जन्मगाव म्हणून चौफेर नावलौकिक आहे अशा शेलगाव बोंदाडेचे काही कारणास्तव थेट सरपंच पद रिक्त झाल्याने, थेट सरपंच पदाकरिता पोटनिवडणुक लागली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर निवडणूक रिंगणात दोनच उमेदवार उभे ठाकले. त्यामध्ये थेट सरपंचपद महीला प्रवर्गासाठी आरक्षित होते. तेंव्हा सत्ताधारी गटाकडून ह्या शेलगाव (बोदाडे) ग्रामपंचायत वर अनेक वेळा सत्ता स्थापन केलेल्या तसेच त्यांच्या कार्यकाळात अनेक नामांकित पुरस्कारांनी नावलौकिक मिळविलेल्या आणि २०११च्या जनगणना नुसार १३४१लोकसंख्या असलेल्या तसेच तिन पिढ्यापासुन उच्च विद्या विभूषित असलेल्या आणि या शेलगावातील प्रथम शिक्षक झालेल्या स्व. नामदेवराव इंगोले गुरुजी अशा नावाजलेल्या इंगोले घराण्यातील सौ. आचल अनंता ईंगोले ह्यांनी थेट सरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. मागीलतिन दशकांपासून हे राजकीय घराणे सक्रिय असल्याने आणि त्यांची सत्ता असल्याने या घरातून थेट सरपंच पदाकरिता उमेदवारी दाखल होणे क्रमप्राप्त होते. तर दुसऱ्या बाजूने या शेलगाव बोंदाडे गट ग्रामपंचायतला जुळलेली अत्यंत लहान सहान दोन खेडी २०११ च्या जनगणनेनुसार अत्यल्प १६८ लोकसंख्या असलेलं ब्राह्मणवाडा खुर्द आणि फक्त २३५ लोकसंख्या असलेले ब्राह्मणवाडा बुद्रुक गावे. हि एवढी लहान गावी आहे ती त्यांच्या अख्ख्या गावा मिळून एक प्रभागही पूर्ण होत नाही. ब्राह्मणवाडा बुद्रुक संपूर्ण गाव आणि शेलगावातील काही भाग मिळून प्रभाग क्रमांक दोन तयार झाला तर ब्राह्मणवाडा खुर्द संपूर्ण गाव आणि शेलगावातील काही भाग मिळून प्रभाग क्रमांक तिन तयार झाला. ब्राह्मणवाडाखुर्द हे एवढे लहान गाव आहे की या गावात आजतागायत साधी अंगणवाडी झाली नाही. आजतागायत शाळा उघडली नाही. दोन्ही गावाच्या पटसंख्या मिळून कशी बशी ब्राह्मणवाडा बुद्रुक या गावात ४थ्या वर्गापर्यंत शाळा चालते. पावसाळ्यात जर पुलावरून पाणी वाहू लागले तर ब्राह्मणवाडा खुर्द च्या विद्यार्थ्यांना शाळेतही जाता येत नाही. अशा इवल्याशा गावांमधील सौ. सुशिलाबाई शेषराव गोटे यांनी १३४१ लोकसंख्या असलेल्या शेलगावातील राजकारणातील फार मोठे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या घराण्यातील उमेदवार प्रतिस्पर्धी असतानाही पोटनिवडणुकीत थेट सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तो दोन्ही ब्राह्मणवाडा आणि ओंकारगिरबाबांचे शेलगाव ह्या तिन्ही गावातील बहुतांश मंडळींनी पाठिंबा दर्शविल्याने त्यांनी ही थेट सरपंच पदाची निवडणूक लढण्याच धाडस केले. मंगळवारी (दि.२८) रोजी मतदान झाले. आणि बुधवारी निवडणूक निकाल घोषित झाला. तो निवडणूक निकाल ग्रामपंचायत स्तरावरील थेट सरपंचपदांच्या निवडणुकात अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधणारा ठरला. वाशीम जिल्ह्यातील शेलगाव बोंदाडे गट ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकीत १२०३वैध मतदान झाले.अवघी १६८ लोकसंख्या असलेल्या आणि सुमारे १०८ मतदान झालेल्या ब्राह्मणवाडा खुर्द गावातील सौ. सुशिलाबाई शेषराव गोटे यांना तब्बल ७०८मते मिळाली तर १३४१ लोकसंख्या असलेल्या शेलगाव बोंदाडे येथील सौ. आचल अनंता इंगोले ह्यांना ४८८मते मिळाली तर नोटाला ७ मते गेली आणि तब्बल २२० मतांनी चिमुकल्या ब्राह्मणवाडा खुर्दच्या सुशीलाबाई शेषराव गोटे निवडून येत त्यांनी महाराष्ट्रात सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या गावातील महिला तीन गावांच्या गट ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत निवडून येण्याचा एखादा अपवाद वगळता विक्रम केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यांना ओंकारगीर बाबांच्या शेलगावासह दोन्ही ब्राह्मणवाड्यांनी भरभरून मतदान केल्याने हे शक्य झाले कारण प्रभाग एक जो पूर्णता शेलगाव मध्ये येतो त्यामध्ये त्यांना सुमारे ७३ मताधिक्य असावे तसेच ब्राह्मणवाडा बुद्रुक आणि शेलगावातील काही भाग मिळुन असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांना सुमारे १३५ मताधिक्य मिळाले असावे तर त्यांचा ब्राह्मणवाडा खुर्द आणि शेलगावचा बहुतांश भाग असलेल्या प्रभाग क्रमांक तिन मध्ये सुमारे २६ मतांची आघाडी असावी त्यामुळे त्यांचा हा विजय त्यांच्या गावासोबतच शेलगाव बोंदाडेआणि ब्राह्मणवाडा बुद्रुक अशा तिने गावांचे गावकऱ्यांनी दिलेल्या भरभरून मतदानामुळे झाला आहे.निवडणूका म्हटल्यावर जय आणि पराजय होतचं असतो. त्यामुळे विजयाने हरखुन जाण्याचं काही एक कारण नाही. आपण जरी अवधी सुमारे चाळीस पन्नास घरे आणि १६८ लोकसंख्या असलेल्या इवल्याशा गावांमधील रहीवाशी असले तरी या दोन्ही ब्राह्मणवाड्यासह ओंकारगीर बाबांचे शेलगाव ह्या तिन्ही गावातील गावकऱ्यांनी भरभरून मतदान केल्याने आपण विजय झालोत त्यामुळे आपल्या ह्या विजयाचे सर्व श्रेय आपण या तिन्ही गावांतील समस्त नागरिकांना समस्त मतदार बांधवांना देत आहोत. सौ. सुशीलाबाई शेषराव गोटे नवनिर्वाचित थेट सरपंच शेलगाव (बों) गट ग्रामपंचायत ता. मालेगाव
