
बौद्ध पौर्णिमेला धम्म रॅली व धम्म परिषदेचे आयोजन
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
बौद्ध पौर्णिमेला तथागत भगवान बुध्द यांच्या मुर्ती प्रतिष्ठापणा दुसऱ्या वर्षाच्या वर्धापण दिनानिमतीत्त समता सैनिक दल यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले. तर २ मे रोजी भारतीय बौध्द महासभा तालुका मालेगांव अंतर्गत मालेगांव शहर शाखा मार्फत विद्वान भिक्षु संघ यांच्या मार्गदशाखाली एक दिवसीय धम्म परिषद आयोजीत करण्यात आली आहे. भव्य धम्म रॅली तक्षशिला बुध्द विहार पासुन सकाळी ८ वा. ३० मि. सुरु होईल ती शहरातील प्रमुख मार्गावरून परत येवून समारोप तक्षशिला बुध्द विहार येथेच होईल. भारतीय बौध्द महासभा शाखा मालेगांव यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय धम्मपरिषदशनिवार दि. २/५/२०२६ स्थळ तक्षशिला बुध्द विहार, पंचशील नगर, तहसिल कार्यालयाच्या पाठीमागे, मालेगांव येथे आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणिय पुज्य भन्ने बी. संघपालजी महाथेरो (भा.वी. न. राष्ट्रीय उपाव्यतनितु संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष),प्रज्ञापाल थेरो, वाशिम डि.धम्मशरन महाथेरो, बाळापुर पुज्य भिक्खु पुज्य भिक्खु पुज्य भिक्खु नागमार्ग, राजगांव व भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रमुख उपस्थिती सिध्दार्थजी भगत जिल्हाध्यक्ष वाशिम भा.बौ.म., देवानंद वाकोडे सचिव वाशिम जि. भा.बौ.म., प्रा. मुकुंद वानखेडे कोष्याध्यक्ष वाशिम जि.भा.बी.म.,मेजर अश्विन खिल्लारे समता से. दल. प्रमुख वाशिम, विलास गुडदे ता. अध्यक्ष मालेगांव भा. वौ.म., राहुल वानखेडे ता. सचिव मालेगांव भा.बौ.म.,कैलास भिवाजी इंगळे ता. शहराध्यक्ष मालेगांव भा. बौ. म. व वाशिम जिल्हा व मालेगांव तालुका व शहर कार्यकारणी भारतीय बौध्दमहासभा बोध्दाचार्य :- पुंडलीक पखाले, हरीश्चंद्र पोफळे, कैलास इंगळे, ज्ञानबाजी वानखडे, दिपक घुगे, धम्ममित्र पंडीत बंडुजी पोफळे, गजानन इंगळे, जिवन तायडे, सुखदेव इंगळे, बाळु पोफळे (सरपंच जामखेड), शालीकराम पोफळे आदी धम्मासनावर उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीत व धम्म परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
