ज्ञानेश्वरीच्या रुपाने झोडगा खुर्द गावाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा

ज्ञानेश्वरीच्या रुपाने झोडगा खुर्द गावाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

मालेगाव पं.स अंतर्गत येणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा झोडगा खुर्द येथील शैक्षणिक प्रगतीच्या शिरपेचात आणखी एक सन्मानाचा तुरा कु. ज्ञानेश्वरी कैलास भिवरकर हिच्या रूपाने खोवल्या गेला आहे.यापूर्वी याच शाळेतील कु. सुजाता सरकटे या विद्यार्थ्यांनीने नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्यातून एस.सी.मुलीमध्ये प्रथम येऊन गौरवशाली यश संपादन केले. यानंतर सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळा या नामांकित CBSC शाळेमध्ये कु. ज्ञानेश्वरी भिवरकर हिची निवड संपूर्ण गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे.
दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्रित येऊन कुमारी ज्ञानेश्वरी भिवरकर हिचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीराम मुठाळ श्रीराम सुरूशे नारायण मुठाळ नारायण सरकटे


रामकिसन वाघ गजानन सुरूशे विठ्ठल सुरूशे योगेश मुठाळ राहुल मुठाळ सुमेध सुरुशे रामदास मुठाळ डिगाबंर बोरकर भाऊराव सुरुशे विकास वाझुळकर नंदाबाई सुरुशे दिशा इढोळे माया सरकटे विद्या सरकटे कावेरी सोमटकर लक्ष्मी सुरुशे
वैशाली मुठाळ मीनाक्षी सुरुशे इ. सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरस्वती विद्या अकॅडमी ही लोणावळा पुणे येथील एक नामांकित निवासी CBSC शाळा असून ही संस्था ग्रामीण महाराष्ट्रातील गरजू पात्र आणि हुशार मुलांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत मोफत, निवासी, उच्च गुणवत्ता पूर्ण जागतिक दर्जाचे शिक्षण देते. या ठिकाणी आधुनिक वर्गांसह स्मार्ट क्लासरूम, लायब्ररी, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित आणि संगणक यांच्या आधुनिक लॅब यासह क्रीडांगण, मनोरंजन वस्तीगृह आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच योग शिक्षणासोबत संगीत, नृत्य,कला आणि इतर उपक्रमांसाठी सर्व सुविधायुक्त स्टुडिओ उपलब्ध आहे.जि. प. प्राथमिक शाळा झोडगा खुर्द येथील विद्यार्थ्यांनीची ही निवड कौतुकास्पद असून या शाळेत नवोदय स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी ज्यादा वर्ग घेतले जातात. आणि सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळा सारख्या नामांकित शाळांच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात मार्गदर्शनही केले जाते. झोडगा खुर्द येथील पाचवी मध्ये नवोदय तसेच शिष्यवृत्ती साठी एक्स्ट्रा क्लास येथील विकास वाझुळकर सर यांनी घेतल्यानेच प्रगती झाली असल्याचे गावकऱ्यांनी सरांचे आभार मानले आपले यशाचे श्रेय मुलींनी विकास सरांना दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *