मालेगाव शहरातल्या पाणी टंचाई संदर्भात पालकमंत्री सोबत चर्चा

मालेगाव शहरातल्या पाणी टंचाई संदर्भात पालकमंत्री सोबत चर्चा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

वाशिम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भावनाताई गवळी यांच्या मार्फत मालेगाव शहरातील तीव्र पाणीटंचाईबाबत महत्त्वाची मागणी सादर करण्यात आली.मालेगाव शहरात सध्या जाणवत असलेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी विशेष “जिल्हा आकस्मिक निधी” उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मालेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे, खवले पाटील नगरसेवक विनोद बानाईतकर, गजानन काळे, अभी घुगे तसेच शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्याधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन तातडीने करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *