नगर परिषदेत विरोधकांचा सभात्याग बोलण्याचा हक्क नाकारल्याचा आरोप

नगर परिषदेत विरोधकांचा सभात्याग बोलण्याचा हक्क नाकारल्याचा आरोप

जळगाव जामोद प्रतिनिधी

दि. 29 एप्रिल रोजी झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी सदस्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सांगितले की, त्यांना सभेमध्ये सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा व बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला तसेच नियमांचा आधार घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.या कथित अलोकशाही वागणुकीच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सभागृहाचा त्याग (सभात्याग) केला.तसेच, विरोधी पक्षाच्या सर्व महिला नगरसेविकांना अद्याप स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांची कामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले.विरोधी पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, संबंधित सभेची व्हिडिओ रेकॉर्डिंग व कार्यवाहीची प्रत देण्याची मागणीही केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची खात्री देण्याची मागणी करण्यात आली आहे.जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा विषय वरिष्ठ स्तरावर नेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विरोधी सदस्यांनी दिला आहे.यावेळी वाजेदा अंजुम अब्दुल जहीर गटनेता शहर विकास आघाड़ी ,संगीता भारसाकळे गटनेता कॉंग्रेस , मीना सातव नगरसेविका ,इरफान खान नगरसेवक राष्ट्रवादी, फर्जाना बी सय्यद अफरोज नगरसेविका,समीना साकीर खान नगरसेविका वैशाली निलेश तायडे नगरसेविका, नगरसेवक सिदार्थ हेलोडे राष्ट्रवादी , नगरसेवक,सय्यद नफिज नगरसेवक समाजवादी , शेख गुलाब नगरसेवक एमआयएम, मोहंमद सलीम नगरसेवक, करीम खान नगरसेवक राष्ट्रवादी सर्व विरोधी नगर सेवक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *