
मालेगाव तहसीलचा जिल्हास्तरावर गौरव; जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या हस्ते गोरे मॅडम व लहाने सन्मानित
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करत मालेगाव तहसील कार्यालयाने जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘२८ एप्रिल – सेवा हक्क दिन’ निमित्त माननीय जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते मालेगावच्या निवासी नायब तहसीलदार श्रीमती रंजना गोरे आणि सेतू लिपिक दिपक लहाने यांना उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.९९% सेवा वेळेत पूर्ण – विशेष बहुमानजिल्ह्यात सेवा हक्क कायद्यांतर्गत प्राप्त विविध अर्जांपैकी तब्बल ९९% प्रमाणपत्रे व दाखले विहित कालमर्यादेत नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल हा विशेष गौरव प्रदान करण्यात आला. मालेगाव तहसील प्रशासनाच्या तत्परता व पारदर्शक कारभाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. एकाच वेळी तहसीलमधील दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव होणे ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.शपथविधी व प्रमाणपत्र वाटपया दिनाचे औचित्य साधून सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. दीपक पुंडे यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सेवेची बांधिलकी’ जपण्याची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’ येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती गोरे यांनी भेट देऊन नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप केले.QR Code मुळे पारदर्शकतेला गतीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार, मालेगाव तहसील व सर्व ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवर QR Code प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना विविध सेवांचे शुल्क व आवश्यक कागदपत्रांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार असून कामकाजात अधिक सुसूत्रता व पारदर्शकता येणार आहे.या गौरव सोहळ्याबद्दल व यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून मालेगाव तहसील प्रशासनाचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाला तहसीलदार श्री. दीपक पुंडे, सन्मानित अधिकारी, तहसील कर्मचारी, ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’ चालक श्री. सागर भुतडा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
