
N C M C कार्ड लाडक्या बहिणीची ठरत आहे डोकेदुखी!अपंगांना,वयोवृद्धांना एस टी बससाठी मोफत कार्ड द्यावे उषा जाधव
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी एसटी बस साठी अनिवार्य नॅशनल कॉमन मोबालिटी (NCMC) कार्ड ची सक्ती केल्याचे चित्र दिसत असून याकरिता तालुक्याच्या ठिकाणी एसटी बसने प्रवास करणाऱ्या वृद्ध अपंग व सर्वच महिलांसाठी एक प्रकारची डोकेदुखी दिसत असून याकरिता ग्रामीण भागातल्या लोकांनी महिलांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करून तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी जाणे भाग पडत असून खर्चासह यांना उन्हातान्हात जाणे भाग पडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे, अधिकृत ठिकाणी कार्ड देण्याची सुविधा असल्याने त्यांना शासन फी १९९/-रुपये अधिक ५० रुपये वेगळे कामाचे असे अडीचशे रुपये देऊन एनसीएमसी कार्ड करिता लाईन मध्ये उभे राहणे भाग पडत आहे,
बॉक्स– शासनाच्या
वतीनं लाडक्या बहिणींना एसटी बस मध्ये अर्ध्या टिकीटचा प्रवास चालू केले असताना मग त्यांना या एनसीएमसी कार्ड ची गरज का! ७५ वर्षाच्या वरील स्त्री-पुरुष झिरो मोफत प्रवासासाठी करिता ठीक आहे कार्डाची गरज, परंतु त्यांना शासनाच्या वतीनेच मोफत कार्ड देण्यात यावे, तसेच शालेय मुला मुलींना देखील पास धारकांना मोफत कार्डाची व्यवस्था केली पाहिजे, आणि लाडक्या बहिणींना कार्डाची गरज नसली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्त्या उषा जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले, तसेच बाहेर राज्य प्रमाणे सर्वच महिलांना एसटीचा प्रवास हा मोफत केला पाहिजे असे जाधव यांनी सांगितले
