
चिवरा ते तामसी शेतरस्त्याची दुरवस्थाअधिकारी-पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील चिवरा ते तामसी या शेत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता नादुरुस्त असल्यामुळे शेतकºयांना शेत कसताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.चिवरा ते तामसी हा शेतरस्ता गेल्या वीस वषार्पूर्वी करण्यात आला होता.आता मात्र, सदर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून सदर रस्ता हा दुरुस्त करण्यासाठी शेतकरी वर्ग वारंवार मागणी करीत असताना याकडे लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केले जात आहे. सदर नादुरुस्त रस्ता हा आतापर्यंत शेतकºयांनी लोकवर्गणी करून दोन वेळा दुरुस्त केला आहे. आता मात्र, सदर रस्ता हा अत्यंत नादुरुस्त झाला असून या रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. या मार्गावरील शेती बागायती असल्याने बाराही महिने शेतकºयांना या रस्त्यांवर रात्रंदिवस ये-जा करावी लागते. सदर रस्ता दुरुस्ती करण्याबाबत शेतकºयांनी लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी केली. मात्र,सदर रस्ता नव्याने करण्याकडे लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.चौकटरस्ता बनविण्यास राजकीय उदासीनताशेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहेत. यासाठी शासनाचा वेळ, पैसा खर्च होत आहे. तर, चिवरा येथील चिवरा ते तामसी रस्ता परिसरातील जमिक ही सुपिक व बाराही महिने बागायती आहे. शेतकरी वर्ग प्रचंड मेहनत घेत विविध उत्पादन घेत आहे.मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नवीन उत्पादन घेण्यासही बाधा निर्माण झाली आहे. याकडे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. ……………………मधुमित्र, मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविलीवाशीम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव) २० मे रोजीच्या जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२६ च्या मधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात आली आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे आणि यशस्वी मधपाळांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने मंडळाने ही पुरस्कार योजना सुरू केली असून, गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार ११ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार ७ हजार रुपये, तर, तृतीय पुरस्कार ५ हजार रुपये इतका आहे. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, संबंधित जिल्ह्यातील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयातही अर्ज मिळू शकतील. इच्छुकांनी आपले नामांकन ४ मे पूर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
