शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व कार्यशाळा संपन्न

शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व कार्यशाळा संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा संपन्न झाली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मालेगाव-रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीपक पुंड, प्रकल्प संचालक (आत्मा) अनिसा महाबळे, जिल्हा कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर तसेच तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील पीक नियोजन, हवामानानुसार शेती तंत्रज्ञान, जैविक शेती, खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी गटातील सदस्य तसेच कृषी सहाय्यक यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमास डॉ. हेमंत देशमुख, सुरेश शिंदे, बाळासाहेब वाघ, गणेश उंडाळ, गजानन शिंदे, सैय्यद गुलाब, संदीपराव घुगे, अख्तर पठाण, डॉ. प्रमोद नवघरे, गजानन सांगळे, अजिंक्य मेडशीकर यांसह राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. शेवटी आयोजित शंका-निरसन सत्रात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन केले. शेतीत विज्ञानाधारित पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनवाढीस चालना मिळू शकते, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक तुषार मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल तांबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *