रामा इंटरनॅशनल स्कुल वाशिम येथे योग प्राणायाम शिबीराचा समारोप

रामा इंटरनॅशनल स्कुल वाशिम येथे योग प्राणायाम शिबीराचा समारोप

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (उमेश लहाने)

पतंजली योग समीती महाराष्ट्र पूर्व व व्यंकटेश योगाभ्यासी मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने नि:शुल्क योग प्राणायाम शिबीराचा आज उत्साहात समारोप झाला. आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या मानवी जीवनशैलीमुळे तनाव वाढुन विविध आजार होत आहेत,त्यामुळे नियमीत योग प्राणायाम केल्याने आपण स्वस्थ,उत्सावर्धक,
सकारात्मक व तणावमुक्त जिवन जगु शकतो.
रामा इंटरनॅशनल शाळेच्या भव्य लाॅनवर दि. १९ ते २६ मार्च गुढीपाडवा ते रामनवमी असे आठ दिवसीय योग प्राणायाम शिबीर सकाळी ६ ते ७ या संपन्न झाले आहे.
या योग शिबीरात योगशिक्षक म्हणुन पतंजली योग समीती महाराष्ट्र पूर्व चे सहराज्यप्रभारी शंकर नागापुरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले आहे.
शाळा संस्थेचे प्रमुख विजयराव जाधव नेहमीच आपल्या शैक्षणीक संकुलात विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतात,त्याचाच एक भाग सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणुन योग शिवीराचे आयोजन केले आहे तरी आपण सर्व कुटुंबाने या शिवीराचा अवश्य लाभ घ्यावा.
या योग शिविरासाठी विशेष सहकार्य डाॅ.रोशन व्यास व डाॅ.राखी व्यास यांनी केले आहे.
योग शिविरची तयारी व प्रसार-प्रचारासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका सोबतच अमीत जैयस्वाल व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.
योग शिबिरात सहभागी होणारे साधकांना प्रमाणपत्र देउन सन्मानीत करण्यात आले. याच ठिकाणी पुढेही दैनिक नि:शुल्क योग वर्ग नियमीत सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *