तिवस्यात समता सैनिक दल स्थापनादिनानिमित्त प्रशिक्षण शिबीर

तिवस्यात समता सैनिक दल स्थापनादिनानिमित्त प्रशिक्षण शिबीर

ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे

समता, बंधुता आणि सामाजिकन्यायाच्या विचारांना वाहिलेल्या समता सैनिक दलाचा ९९वा स्थापना दिन तिवसा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने समता सैनिक दल शाखा तिवसा यांच्या वतीने भव्य एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, तिवसा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भदंत डॉ. सत्यानंदजी महाथेरो (अखिल भारतीय बौद्ध गया मुक्ती आंदोलन, येनाडा) यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे, तिवसा तालुका अध्यक्ष भारत दहाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मा. उषाताई बाटाणे, विजय बनसोड, प्रा. डॉ. विजयाताई मुळे, डॉ. दादाराव रामटेके, मा. हेमराजी खोब्रागडे, बाबाराव सोमकुवर,उपासक-उपसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादसिद्धार्थ मुद्रे, जिजाबाई निकाळजे, सविताताई खाकसे, ममताताई घरडे, ज्ञानेश्वर बनोरे, सुदर्शन यावले, अॅड. प्रमोद गाडे, भास्करराव काळे, सागर भवते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.शिबिरात उपस्थित मान्यवरांनी समता सैनिक दलाचे उद्दिष्ट, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य या विषयांवर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरितकेले. पूज्य भदंत डॉ. सत्यानंदजी महाथेरो यांच्या हस्ते आदर्श व्यक्तींचे पूजन करून कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समता सैनिक दलाला सहकार्य करणा-या दानदात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्राजक्ता अनिल थूल, जिजाताई निकाळजे, भास्करराव काळे, प्रा. डॉ. उमेश मेश्राम, विनोद कठाणे (पुणे), प्रा.डॉ. विजयाताई मुळे, गजानन रामटे‌के, सुदर्शन याबले यांचा समावेश होता. जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजाला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. या शिबिराला तिवसा तसेच परिसरातील डेहणी, से. बाजार, भांभोरा, पालवाडी, ठाणाठुणी, काटसूर, नमस्कारी, जावरा, करजगाव, सातरगाव, जमडोल, माडी, आनंदवाडी, तळेगाव (ठा), गुरुदेव नगर, सिरजगाव आदी गावांमधील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आणिभीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत दहाट, गजानन रामटेके, प्रा. डॉ. उमेश मेश्राम, किशोर माहोरे, विलास मेश्राम, बालूभाऊ डोळस, कवीकुमार काळबांडे, अजय थोरात, राहुल बोंद्रे, निखिल लढे, निलेश माहोरे, संजय गडलिंग, अनिल गाडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत दहाट यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. उमेश मेश्राम यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन किशोर माहोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *