
अमानी व तोडगा खुर्द येथे महाप्रसादाचे वितरण
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,२८:-तालुक्यातील अमानी आणि तोडगा खुर्द येथे राम नवमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, महाप्रसादासह दर्शनाचा लाभ गावातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला, २६ मार्च रोजी, श्रीराम जन्मोत्सव निमित्त अमानी येथे दरवर्षीप्रमाणे अनेक वर्षापासून स्व सखाराम गणपती गवळी यांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सव हा त्यांच्या परिवाराने सुद्धा नियमित चालू ठेवला असून त्यांचे चिरंजीव अनिल गवळी व प्रमोद गवळी हे पण साजरा करत आहेत, रामनवमीच्या अगोदर रात्री ह भ प श्रीराम महाराज नवघरे पांगरी नवघरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, तर दुसऱ्या दिवशी सकाळी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला, प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, महाराजांचं काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये भावीकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला नंतर श्रीराम प्रभुच्या प्रतिमेची व ग्रंथांची टाळ मृदुलगाच्या गजराने मिरवणूक काढली, तसेच झोडगा खुर्द येथील रमेश सारंगधर वाघ यांनी प्रथमच श्रीराम नवमी निमित्त महाप्रसादाचे वाटप केले, रमेश वाघ हे आता दरवर्षीच रामनवमी जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचा वाटप करणार आहेत
