शहरात पॉवर पेट्रोलच्या नावाखाली लूट.डिझेलचे मर्यादित वितरण

शहरात पॉवर पेट्रोलच्या नावाखाली लूट.डिझेलचे मर्यादित वितरण

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरात डिझेलचा तुटवडा सदृश्य परिस्थिती व पेट्रोल डिझेल मिळणार नाही, या भीतीमुळे अनेक वाहनधारक पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून आपल्या वाहनांमध्ये तसेच कॅन बॉटलमध्ये अतिरिक्त डिझेल पेट्रोल नेत आहेत. याच गोष्टीचा गैरफायदा शहरातील व तालुक्यातील काही पेट्रोलपंप चालक घेत असून साधे पेट्रोल शिल्लक नसल्याचे कारण देत इच्छा नसतानाही सक्तीने ‘पॉवर पेट्रोल’ वाहन चालकांना माथी मारले जात आहे. विशेष म्हणजे काही वाहनधारकांना पावर व साधे पेट्रोल नेमका काय प्रकार आहे हे कळत नसल्याने पावर पेट्रोलच्या नावाखाली वाहनधारकांची सर्रास लूट चालू असल्याचा आरोप अनेक वाहन धारकांमधून मधून होत.
वाहनचालकांच्या माथी पडणारा हा नाहकचा भुर्दंड घालविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी वाहनधारकाडून केला जात आहे. नामांकित कंपनीच्या खपविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. साधे पेट्रोल शिल्लक असतानाही ते संपल्याचे सांगून ‘पॉवर पेट्रोल’ सक्तीने भरण्यास सांगितले जात आहे. पंपावर चालकाच्या अडेलतट्टू भूमिकेने महाग पॉवर पेट्रोल आपल्या वाहनात भरावे लागत आहे.
त्यामुळे वाहनधारकांची इच्छा नसतानाही त्यांना नाईलाजास्तव जादा दराचे पेट्रोल भरावे लागत आहे. साध्या आणि पॉवर पेट्रोलच्या भावामध्ये लेटर मागे दहा रुपयांचा फरक पडतो. साध्या पेट्रोलचा दर १०५ रुपये आहे. तर, पॉवर पेट्रोलचा दर ११५ रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक लीटर मागे दहा रुपये जादा मोजावे लागत पेट्रोल पंपाची तपासणी करून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
शहरात डिझेल केवळ पाचशे रूपयाचेच दिले जात आहे. पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याचा अफवाचा गैरफायदा घेणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर प्थशासनाचा कोणताही वचक दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *