मुंदडा विद्यालय पतसंस्थेच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

मुंदडा विद्यालय पतसंस्थेच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि, २५ स्थानिक नाथूराम नारायणदास मुंदडा विद्यालय पगारदार सेवकांच्या पतसंस्थेच्या वतीने गांधी चौक, मालेगाव येथे पाणपाईचे उद्धाटन करण्यात आले. जल म्हणजे जीवन या उक्ती प्रमाणे तहानलेल्या प्रवाशांना शीतल जल देवून तृप्त करण्याचा मानस मनासी बाळगून पाणपोईचे उद्धाटन करण्यात आले. ‘पाणपोई’ म्हणजे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ऊन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्या साठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे सामाजिक जाणीव जीवंत असल्याचे लक्षण आहे. ‘पाणपोई’ हा एक सामाजिक उपक्रम असून तहानलेल्या वाटसरूंना पाणी पाजणे हे एक सामाजिक काम आहे. पाणपोईचे उद्धाटन प्रसंगी ना.ना.मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय रामचंद्र मुंदडा, सचिव आशिष मुंदडा, मालेगाव नगर परिषदचे नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे, संस्थेचे संचालक जगदीश बळी, ह.भ.प. श्री मुंढे गुरुजी, प्रतिष्ठीत नागरीक प्रेमरतन भुतडा, माजी उपप्राचार्य श्रीकिसन shrikrishna मानधने, प्रवीणजी काबरा, कचरूलाल वर्मा, प्राचार्य दिनेशकुमार उंटवाल, पर्यवेक्षक गजानन पाटील, पतसंस्था अध्यक्ष प्रा अनिल काळे, सचिव प्रा अंनत गायकवाड, उपाध्यक्ष संदीप सावले, संचालक अश्विनी बैस, सविता क्षीरसागर, संजय साबळे, प्रा अरविंद पिंपळकर, जेष्ठ शिक्षक राजेश कराळे, गजानन घुगे आदी मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *