बँकेच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या डॉ संतोष कोरपे यांचे आवाहन

बँकेच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या; डॉ. संतोष कोरपे यांचे आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

ता 22 – अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ता २१ मार्च ला मालेगाव शहरातील बालाजी लॉन मंगल कार्यालय येथे सभा उत्साहात पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनी, बँकेची प्रगती आणि सभासदांचे हित जोपासणाऱ्या उमेदवारांनाच कौल देण्याचे आवाहन केले.​​या विशेष सभेत अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल डॉ. संतोष कोरपे आणि डॉ. जयराज संतोष कोरपे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

​व्यासपीठावर दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ​डॉ. संतोष कोरपे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
​ललित बहाळे जिल्हा बँकेचे संचालक
​डॉ. जयराज कोरपे ​सौ. गीताबाई ठाकरे ​सौ. अर्पणाताई धोत्रे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला चे सभापती ​शिरीष धोत्रे उपस्थित होते ​यावेळी सभेला जिल्हा बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, गोपाल पाटील राऊत, प्रकाश पाटील कुटे, नितीन जाधव, अंबादास पाटील कुटे, बबनराव गवळी, सुरेशराव शिंदे, सेवाराम आडे, किसनराव गवळी माजी आमदार,अनिल जाधव संचालक अकोला वाशिम जिल्हा सहकारी बोर्ड, विवेक गवळी, जगदीश घुगे, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते
​डॉ. संतोष कोरपे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, सहकार क्षेत्रातील या बँकेने शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या कल्याणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्व निवडणे काळाची गरज आहे.बैठकीचे संचालन करण्यात प्रा अरविंद गाभणे यांनी, प्रास्ताविक डॉ जयराज कोरपे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा अनिल काळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *