
॥ चलो मांडवगण ॥ ॥ चलो मांडवगण ॥राष्ट्रसंत कैकाडी महाराजांचा जयंती उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहा अनिल जाधव यांचे आवाहन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
राष्ट्रसंत कैकाडी महाराजांची जयंती जन्मगाव मांडवगण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे गुरुवार दिनांक 26/03/2026 रोजी दुपारी ०२ वाजता.सालाबाद प्रमाणे साजरी होणार आहे. संत कैकाडी बाबांचे भक्तगण, मांडवगण ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भक्तगण, महाराष्ट्र व इतर राज्यातील कैकाडी समाज बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, मांडवगण तालुका श्रीगोंदा येथे अनेक वर्षापासून बाबांची जयंती साजरी केली जात आहे. बाबांनी केलेल्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याचा उलघडा, विविध विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम केली जातात. मांडवगण ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या व कैकाडी समाज बांधवांच्या मदतीने, लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने, भव्य दिव्य मंदिराचे व सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यावर्षी देखील संत कैकाडी बाबांचे विचार यावर प्रबोधन, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, सामुदायिक भजन आरती, प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाज बांधवांचा सन्मान आणि नवनिर्वाचित नगरसेवक, पं.स.व जि.प. सदस्य यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.मांडवगण येथे पुढील आगामी काळात समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी समाज बांधवांसमवेत चर्चासत्र होणार आहे. कार्यकर्ता प्रशिक्षण, विभागीय वधू वर सूचक मेळावे तसेच कैकाडी समाज क्षेत्रिय बंधनासाठी प्रयत्न करत असणाऱ्या आपल्या नेत्यांना, समाज बंधूंना अधिक जोमात प्रयत्न करण्यासाठी ठराव संमत करणे. कैकाडी समाजाची तालुका निहाय जनगणना मोहीम राबविणे. समाजातील वंचित घटकांसाठी ठोस कार्यक्रम हाती घेणे. असे विविध समाज उपयोगी कार्याची चर्चा करणे. अधीक उपक्रमशील कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी संत कैकाडी बाबांच्या जन्म गावी जयंतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केले आहे.
