आई-वडिलांचे कष्ट शिक्षकाची शिकवण व स्वतः केलेला अभ्यासामुळेच सुजाता यशस्वी उषा जाधव

आई-वडिलांचे कष्ट शिक्षकाची शिकवण व स्वतः केलेला अभ्यासामुळेच सुजाता यशस्वी उषा जाधव

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,२१:- मालेगावतालुक्यातील झोडगा खुर्द या छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील वर्ग पाच मधील विद्यार्थिनी सुजाता सरकटे हि नवोदयच्या प्रवेश परीक्षेत मागासवर्गीय मुली मधून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून तिचे तिच्या वर्ग शिक्षकाचे व आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे, बाबासाहेबांच्या चिमुकल्या लेकीने मागासवर्गीय मुलीं मध्ये वाशिम जिल्ह्यातून प्रथम येण्याचा नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश प्राप्त केल्याने, समाजाचे तसेच गावाचे नावलौकिक केल्यामुळे तिचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन उषा जाधव माजी जि प सदस्य यांनी केले, पांगरी नवघरे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या झोडगा खुर्द येथील सुजाता सरकटे या मुलीचा नवोदय मध्ये नंबर लागल्याने तिचा सन्मान अमानी येतील समाजसेवक अनिल जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या अर्धांगिनी मा जि प स उषा जाधव यांनी सुजाता ला शालेय साहित्य देऊन सन्मानित केलं तसेच तिचे आई-वडिलांचा सुद्धा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, याप्रसंगी माजी उपसरपंच अनिल जाधव, श्रीरामजी सुरोशे, नारायण सरकटे यांची उपस्थिती लाभली होती, झोडगा खुर्द येथील पाच विद्यार्थ्यांनी नवोदय ची परीक्षा दिली होती यामध्ये सुजाता हिला ९७.५० गुण प्राप्त झाले, फक्त उर्वरित चार विद्यार्थी एक एक दोन मार्कने अनउत्तीर्ण झाले, यासाठी वर्गशिक्षक विकास वाझुळकर, यांनी मुलांकडून, चांगला अभ्यास करून घेतला होता रोज सकाळी व सायंकाळी नियमितपणे अभ्यास करून घेत होते, यामध्ये वाझूळकर सरांचा सिंहाचा वाटा असल्याचे, आई वडीलांनी सांगितले,सुजाता चे वर्ग शिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *