
- जि. प. प्रा. शाळा झोडगा खुर्द येथील कु. सुजाता सरकटेचे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्र परीक्षेत गौरवशाली यश संपादन मागासवर्गीय मुलीमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने
जि.प.प्रा.शाळा झोडगा खुर्द शाळेतील विद्यार्थीनी कुमारी सुजाता भिमराव सरकटे हिने नवोदय परीक्षेमध्ये ९७.५० गुण मिळवून गौरवशाली यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी अंतर्गत दरवर्षी होत असलेल्या आणि अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत सुजाता ने अतिशय जास्त स्पर्धा असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातून एकूण विद्यार्थ्यांमधून १२ वा क्रमांक मिळवला. तर मागासवर्गीय मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे तसेच गावाचे नाव शिक्षण पटलावर आणले आहे.जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्यामुळे तिने हे यश संपादन केले. श्री ससाणे सर शिक्षणाधिकारी जि.प.वाशिम व श्री डाबेराव सर उपशिक्षणाधिकारी जि.प. वाशिम यांनी शाळा भेटी दरम्यान नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मुलांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री परांडे सर गटशिक्षणाधिकारी मालेगाव, श्री बोरकर सर केंद्रप्रमुख अमानी यांच्या सतत होणाऱ्या भेटीमधून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. जि.प. प्रा. शाळा झोडगा खु. येथील माजी मुख्याध्यापिका कु. रंजना उबाळे,मुख्याध्यापक श्री डिगांबर बोरकर शाळेतील शिक्षक श्री विकास वाझुळकर, श्री रामदास मुठाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षेचा निकाल लागताच संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन तिचा येथोचित सत्कार करुन तिचे कौतुक केले. याप्रसंगी गावातील काशिराम मुठाळ, श्रीराम सुरुशे, किसन मुठाळ,नारायण सरकटे, रामकिसन वाघ,सुधाकर सरकटे, विजय सरकटे,अक्षय सरकटे,विशाल सरकटे, राहुल मुठाळ, श्रीराम सरकटे, मदन सुरुशे, विवेक सरकटे, सुदर्शन धुळधूळे, भिमराव सरकटे, गजानन सुरुशे, राजु सरकटे, गोविंदा सरकटे, वैभव सरकटे, आकाश सरकटे, राहुल सरकटे, भाऊराव सुरुशे, देवानंद मोरे, दिनेश मोरे, सम्यक सरकटे, गौतम सरकटे मधुकर सरकटे,अतुल सरकटे, संजय वाघ रामदास मुठाळ, अश्विन सुरुशे, ज्ञानेश्वर तुर्के, महेश मुठाळ इत्यादींसह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुजाताच्या या यशामुळे झोडगा खुर्द गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
