समितीने निवड करूनही आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

  • समितीने निवड करूनही आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने

प्रलंबित जिल्हा परिषद प्रशासनाचे गोडबंगाल कळेना रमेश पाटील गोटे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूवाशिम जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्हा परिषदेने एकदाही ग्रामसेवकाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली नाही.वाशिम: शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार साठी पात्र ग्रामसेवक/ ग्रामपंचायत अधिकारी यांची जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड करूनही गेल्या पाच महिन्यापासून वितरण प्रलंबित आहे.. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे प्रस्तावानुसार 16 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत निवड करण्यात आली आहे. सर्व प्रस्तावाची बारकाईने छाननी करून समितीने इतिवृत्त सुद्धा तयार केले आहे. वर्ष न्याय प्रलंबित सर्व प्रस्तावांना मंजुरी सुद्धा दिली यासाठी रमेश पाटील गोटे सेवानिवृत्त ग्रामसेवक तथा वाशिम तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 2 ऑक्टोंबर 2025 महात्मा गांधी जयंती पासून त्यांनी जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने पत्र देऊन एक महिन्यात पुरस्कार वितरण करण्याचे त्यांना लेखी देण्यात आले होते. त्यानुसार शासन निर्णयातील तरतुदीनुसार 16 ऑक्टोंबर 2025 रोजी जिल्हा निवड समितीची सभा घेऊन निवड करण्यात आली. मात्र गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अद्यापही आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण केलेले नाही. या पुरस्कारार्थी पैकी अनेकजण सेवानिवृत्त सुद्धा झालेले आहेत. आदर्श पुरस्कार वितरणासाठी आणि इतर मागण्यासाठी ग्रामसेवक मंडळीचे गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतचे नियमित कामकाज करून प्रशासनासोबत असहकार आंदोलन सुरू आहे. शासन निर्णयात स्पष्ट तरतूद असतानाही 2011 सालापासून पुरस्काराचे आदेश प्रलंबित ठेवणारी आणि जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पुरस्कार वितरण सोहळा प्रलंबित ठेवणारी वाशिम ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचे कळते. विहित वेळेत पुरस्काराचे वितरण न केल्यास जबाबदार कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची 26 सप्टेंबर 2010 च्या शासन परिपत्रकात तरतूद आहे. असे असतानाही वर्षानुवर्ष पुरस्कार वितरण प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील सहकारी बांधवांना उत्साहाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सेवानिवृत्त ग्रामसेवक रमेश पाटील गोटे यांनी विभागीय आयुक्त, यांच्याकडे पत्रव्यवहार करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या आदर्श पुरस्कारार्थी यांना तातडीने आदेश देऊन पुरस्कार वितरण सोहळा घेण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *