महाराजस्व समाधान शिबिरात प्रमाणपत्र वितरण

महाराजस्व समाधान शिबिरात प्रमाणपत्र वितरण

वाशिम जिल्हा प्रतिनिधी-(अनील जाधव)

दि,२०:-शिरपूर येथील कै कोंडबा तात्या ढवळे कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहेत. शासनाच्या वतीने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवार २० मार्च रोजी शिरपूर येथील कै कोंडबा तात्या ढवळे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबिराला विभागीय अधिकारी वैशाली देवकर, शिरपूर ग्रामपंचायत प्रशासक सिंधु कांबळे,तहसीलदार दीपक पुंडे, निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे, नायब तहसीलदार सुनील देशमुख, अरविंद करंगळे गटविकास अधिकारी आर एस कंकाळ, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या महाराजस्व समाधान शिबिरात बोलताना उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली व पाणंद रस्त्यां विषयी उपयुक्त माहिती दिली. तहसीलदार पुंडे यांनी योजनांची माहिती देताना शासन व प्रशासन या बाबत जलदगतीने पुढाकार घेत असल्याचे सांगितले. कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, रहिवाशी दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, सातबारा, वारसा प्रमाणपत्र, फेरफार ,८ अ,सह इतर महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली आहेत. याचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला . यावेळी विस्तार अधिकारी यादव पळसकर,महसूल मंडळ अधिकारी विजय अवचार, ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी, वनविभागाचे मंगेश वाणी, गजानन शिंदे,दीपक लहाने,कै कोंडबा तात्या ढवळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उल्हामाले, ढोरखेडा येथील सरपंच मिटकरी, पत्रकार गजानन देशमुख, कैलास भालेराव, शंकर वाघ, श्याम वाघ,ग्राम महसूल अधिकारी गणेश गवळी, जी एम लादे, वाघ , सानप ,महसूल सेवक किशोर देशमुख,दिलीप कांबळे , यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व शिरपूर मंडळातील तलाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *