
मालेगाव शहरात हॉटेल मध्ये घरगुती गॅसचा वापर, पुरवठा विभागाची कारवाई
मालेगाव प्रतिनिधी, (अनिल जाधव)
दि,१७ :- मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट व चहा-नाश्ता केंद्रांवर अचानक छापे टाकले या मोहिमेत एकूण १४ ठिकाणी तपासणी करण्यात आली, तर दोन ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले तहसील पथकाने अचानक केलेल्या या कारवाईत शेलू फाटा मालेगाव, अकोला फाटा मालेगाव, या दोन ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधितांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी सतत तपासणी मोहीम राबविण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईत निरीक्षण अधिकारी बळीराम वांजोळ, मंडळ अधिकारी नागेश घुगे, ग्राम महसूल अधिकारी धनंजय राऊत, कनिष्ठ लिपिक अजित पखाले, कोतवाल ओम राऊत तसेच गणेश चौके (शिपाई, तहसील कार्यालय मालेगाव) यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारीसहभागी होते प्रशासनाच्या या कारवाईमुळे घरगुती घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील हॉटेल व नाश्ता केंद्रामध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे,हॉटेल व्यावसायिकांना गॅस उपलब्ध होत, नसल्याने,शासनाकडून गॅस बंद असल्याने, शरद इंधन भट्टीसाठी मिळत नसल्याने लघु व्यवसायीकांना उपासमारीची वेळ येत असल्याचे बोलल्या जात आहे,पूर्वी २१ दिवसाच्या आत घरगुती गॅस ची नोंद करण्यात येत होती, व त्यांना गॅस उपलब्ध होत होता परंतु आता ४५ दिवसानंतर याची नोंद होईल व त्यांना गॅस पुरवठा करण्यात येईल असे गॅस एजन्सी चे मालक पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
