शिंदे साहेबाकडून लाडक्या बहिणींचा सन्मान, गल्ली ते दिल्लीवर शिवसेनेचा झेंडा

शिंदे साहेबाकडून लाडक्या बहिणींचा सन्मान, गल्ली ते दिल्लीवर शिवसेनेचा झेंडा :-उषा जाधव( वाघमारेताई ची जशी राज्यसभेवर निवड झाली, तशी गवळीताई ची पण मंत्रिमंडळात निवड करावी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव)

दि, ८ :-माहायुतीच्या राज्य शासनाद्वारे महिलांसाठी अनेक योजना काढलेल्या असून लाडक्या बहिणी सारख्या योजनेसह लखपती दीदी, बाल संगोपन यांच्यासह इतर योजना भाजप शिवसेना, राष्ट्रवादी सरकारकडून

राबविण्यात येत आहेत, माननीय शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी नुकतेच गल्ली ते दिल्ली पर्यंत सोलापूरच्या शिवसेना प्रवक्त्या, मागासवर्गीय असलेल्या ज्योतीताई वाघमारे मॅडम यांना थेट राज्यसभेवर घेतल्याने , लाडक्या बहिणी सह संविधानाचा सन्मान केला असून सर्वत्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असल्याची, प्रतिक्रिया आज महिला जागतिक दिनानिमित्त प्रतिनिधीशी बोलताना उषा जाधव मा जी प सदस्य यांनी दिली असून, शासनाच्या वतीने शेतकरी , मजूर, बेरोजगार, शालेय विद्यार्थी असो महिलांसाठी विविध योजना

राबविल्या जात असतात याचा लाभ पात्र लाभार्थी घेत असून, जसे आदरणीय लाडके भाऊ शिंदे साहेब यांनी सोलापूरच्या लाडक्या बहिणीला जसे दिल्लीला राज्यसभेवर पाठवले असून त्याचप्रमाणे आपल्या भागातील ज्येष्ठ नेत्या आदरणीय अपराजित खासदार, तथा विधान परिषदेच्या सदस्य विदर्भ कन्या भावनाताई गवळी यांना आपल्या वाशिम जिल्ह्यामधून राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन विदर्भातल्या लाडक्या बहिणींना देखील एक गिफ्ट द्यावे, तेव्हाच आपल्या जिल्ह्याचा विकास होण्यास भर पडेल असेही यावेळी उषा जाधव यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *