य.च.सैनिक शाळेचे रमेश आर पडवाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

य.च.सैनिक शाळेचे रमेश आर पडवाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी वाशिम (उमेश लहाने)

शिक्षक हे समाजाची आदर्श पिढी घडविणारे शिल्पकार असतात. विविध क्षेत्रात तथा शैक्षणिक क्षेत्रात विविध पूर्ण कामगिरी करणाऱ्या गुणवान व्यक्तिमत्वाला समाजातील विविध स्तरातील लोकांना कार्याची प्रेरणा देणाऱ्या तसेच जनहिताचा विचार करून स्वकृत्ववाने जन सामान्यांचा मनात स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे शिक्षक रमेश आरपडवाळ यांना दिनांक 7 मार्च 2026 ला जट्टेवार सभागृह,हसनबाग रोड,नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आले.राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 2026 जट्टेवार सभागृह, हसन बाग रोड,नागपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.या सोहळ्यामध्ये राज्यातील अनेक गुणी व उपक्रमशील,तंत्रस्नेही, कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यांचा सत्कार करण्यात आला. रमेश रावसिंग पडवाळ यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या समर्पण, कठोर परिश्रम,नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे तथा नाविन्यपूर्ण उपक्रम घेणे,प्रेरणादायी कार्य तसेच शांत,संयमी,हास्य सम्राट ,शेरोशायरी के बादशाह,सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे,विकासाचे महामेरू,तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षक एवढेच नव्हे तर ते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना वाशिम,शहराध्यक्ष शिक्षक महासंघ, जिल्हाध्यक्ष इब्टा माध्यमिक संघटना वाशिम, महाराष्ट्र राज्य मथुरा लभान संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून ते यशस्वीरित्या काम पाहून आदी पदे ते सध्या भूषवित आहेत आणि विशेष म्हणजे ते पत्रकार म्हणून दैनिक महाभुमी व दैनिक लोक न्याय संघर्ष या वृत्तपत्रामध्ये रिपोर्टर म्हणून उत्कृष्ट काम करत आहे.शिवाय सामूहिक विवाह सोहळा, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, पशुपक्षी प्राणी यांच्यासाठी नेहमी झटणारे ,”झाडे लावा- झाडे जगवा”अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते समाजसेवेत कार्यरत आहेत. सण,उत्सव ,भंडारा, शालेय स्नेहसंमेलन तथा जाहीर सभा यांचे यशस्वी व उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भगिनी यांच्या समस्या सोडवणे यासाठी ही नेहमी तत्पर असतात.हा सर्व त्यांच्या कार्याचा लेखाजोखासमोर ठेवून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून तसेच स्विफ्ट एन लिफ्टचे संचालक निलेशभाऊ साबे,नीलिमाताई गुप्ता यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश रावसिंग पडवाळ यांना संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री मा.सुभाषरावजी ठाकरे साहेब ,संस्थेचे सचिव तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मा.दादासाहेब ठाकरे,शाळेचे मार्गदर्शक डी एन पाटील शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपक्रमशील शिक्षक पी व्ही पवळ,तंत्रस्नेही शिक्षक ए ए गवळी आदी मान्यवरांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी बहुसंख्येने आवर्जून उपस्थिती होती.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊन सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *