अमानी येथील मदन खडसे या शेतकरी युवकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

अमानी येथील मदन खडसे या शेतकरी युवकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या दोन महिन्याने होते मुलीचे लग्न, शेतीवर होते बँकेचे कर्ज

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअनिल जाधव)

दि,९ :-मालेगाव तालुक्यातील मौजे अमानी येथील युवा शेतकरी मदन ज्ञानबा खडसे वय ४५ वर्ष, या युवकाने आपल्या शेतात जाऊन विषारी औषध घेऊन, आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली, अमानी गावापासून दोन-तीन किलोमीटर आंतरराष्ट्रीय स्वतःच्या गट क्रमांक ३४६ क्षेत्रफळ १:६२असलेल्या आपल्या मालकीच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 9 मार्च रोजी सकाळी घडली असून मदन खडसे यांच्यावर बँकेचे कर्ज असून त्यांच्या मुलीचे अवघ्या दोन महिन्यावर लग्न असताना परिस्थिती हलक्याची असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात असून मदन खडसे यांच्या परिवारात अपंग वडील आई ,पत्नी, दोन मुले, व एक मुलगी (नवरी )असून मदन यांनी आपली जीवन यात्रा संपल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सकाळी त्यांचा मुलगा शेतात पाहण्यासाठी गेले असता त्यांचे वडील मदन खडसे हे विषारी औषध घेऊन पडलेले दिसताच त्यांनी गावात कळवले ,मालेगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या परिवाराच्या वतीने फिर्याद नोंदवली असून घटनास्थळी पोलीस कर्मचारी येऊन पंचनामा केला, तसेच संबंधित तलाठी यांनी देखील तसा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *