विज्ञान प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धा उत्साहाराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जाधव विद्यानिकेतनचा उपक्रम

विज्ञान प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धा उत्साहा
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जाधव विद्यानिकेतनचा उपक्रम

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

स्थानिक लाखाळास्थित श्री व्यंकटेश सेवा समिती द्वारा संचालित सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे व मार्गदर्शक म्हणून विज्ञान शिक्षक गणेश भरडे,प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमेश उंडाळ, देशमुख यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वैज्ञानिक शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विज्ञान प्रदर्शनी व वैज्ञानिक रांगोळ्यांची स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक गणेश भरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सकाळपासून ते रात्रीपर्यंत वावरत असताना आजुबाजुच्या नियमित घडणाºया बाबीमधून विज्ञानाची ओळख करून दिली. विध्यार्थ्यांसाठी विज्ञान किती आवश्यक आहे. याबाबत सखोल व सहज लक्षात येईल अशा सोप्या भाषेत विज्ञानाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा वैविध्यपूर्ण उपक्रम प्रत्येक शाळेत घेण्याची गरज आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना समोर येणार संधी मिळते आणि त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यामुळे असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धेचे कौतुक केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका ज्योती भाकरे, शिक्षक हिप्पी भिसडे, अनिल गोरे, राधेश्याम गवळी, रघुनाथ करवते, हनुमान करवते, विलास बाजड, शिक्षिका राधा साबळे, जया आरु, गायत्री देशमुख, पार्वती सुर्वे, शीतल गवळी, वैशाली लहाने, निकिता लहाने, पूजा वाझुळकर व शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर, शोभा पाचरे, रूपाली काटकर आदींसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *