
जिजामाता विद्यालयात नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने
पांगरी नवघरे येथील जिजामाता विद्यालयात राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत हरित सेना प्रमुख नवनाथ मुठाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा जल्लोसात उत्साही वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य राधेश्याम घुगे होते.प्रमुख उपस्थित वनविभागाचे वनपाल जी.जे. चौरंगे,वनरक्षक संतोष राठोड,श्रीनिवास भिसडे,गोपाल ठाकरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.संबंधित मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे विज्ञान शिक्षक रामेश्वर मानवतकर ब यांनी होळीच्या निमित्ताने होणारे वृक्षतोड वाढते,वायू प्रदूषण तसेच रासायनिक रंगाचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय हरित सेनेचे नवनाथ मुठाळ यांनी नैसर्गिक रंग निर्मिती विषयी सखोल मार्गदर्शन करताना असे म्हटले की कृत्रिम रंगामुळे त्वचारोग,एलर्जी व इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात याकडे लक्ष वेधण्यात आले.यावेळी नैसर्गिक रंग घरी कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.पळसाचे फुल, बीट,हळद,झेंडू,जास्वंद,पालक आधीपासून सुरक्षित नैसर्गिक रंग तयार करण्याची माहिती साध्या सोप्या सुलभ भाषेत देण्यात आली.अध्यक्ष भाषणामध्ये शाळेचे प्राचार्य राधेश्याम घुगे यांनी नैसर्गिक रंग निर्मिती विषयी बोलताना असे प्रतिपादन केले की केमिकल रंगापेक्षा नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे म्हणतात जुनं ते सोनं तथा पाण्याची बचत करून पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले आहे.यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. संतोष वाझुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर वाळुकर यांनी मानले संबंधित नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेच्या कार्यक्रमात गणेश वाझुळकर ,गणेश बाजड ,रवी जंजाळकर,वैशाली धंद्रे शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व बहुसंख्येने उपस्थित होते.
