दारूच्या नशेत आलेल्या तिघांनी बारमधील काच, फ्रिजर व इतर साहित्याची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना

शेगाव शहरातील खामगाव रोडवरील डाउनटाउन बार येथे दारूच्या नशेत आलेल्या तिघांनी बारमधील काच, फ्रिजर व इतर साहित्याची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना

शेगाव प्रतिनिधी:(अनिता इंगळे)

रविवारी (१ मार्च) सायंकाळी घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील फिर्यादी राकेश रमेशलाल काशेलानी (वय ५१, रा. काशेलानी मळा, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खामगाव रोडवरील त्यांच्या डाउनटाउन बारमध्ये काही इसमांनी सर्विसच्या कारणावरून वाद घालत बारमधील काच, फ्रिजर व इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच बारवर काम करणारे कर्मचारी इश्वर राजू चंदाने यांना नालीच्या बांधकामासाठी ठेवलेल्या फावड्याने डाव्या पायावर मारहाण करण्यात आली.फिर्यादी काशेलानी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून चापटाबुक्यांनी मारहाण केली. झटापटीदरम्यान फिर्यादी यांच्या हातावर खरचटून जखमा झाल्या. घटनेवेळी बारवरील कर्मचारी शिवा पटोकार, अफजल पटेल, अजय मदनलाल संताने व इतरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी दिपक अशोक ढोले, निलेश महादेव मांजरे व ओम ज्ञानेश्वर फाटे (सर्व रा. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 118(1), 115(2), 352, 324(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस नाईक निलेश गाडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *