दारूच्या पैशांवरून तिनपुतळे परिसरात मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दारूच्या पैशांवरून तिनपुतळे परिसरात मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी शेगाव:(अनिता इंगळे)

शेगाव : शहरातील तिनपुतळे परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सुधाकर उमाळे (वय 48, रा. तिनपुतळे, नागझरी रोड, शेगाव) हे 1 मार्च रोजी रात्री सुमारे 8 वाजता आपल्या घरासमोर बसलेले असताना आरोपी सुमित प्रकाश समदुर (वय अंदाजे 22) व विजय दशरथ समदुर (वय अंदाजे 26, दोघेही रा. तिनपुतळे परिसर, शेगाव) हे तेथे आले. त्यांनी उमाळे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाले.दरम्यान, आरोपी सुमित समदुर याने हातातील स्टीलचे कडे फिर्यादींच्या नाकावर मारल्याने त्यांच्या नाकाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच आरोपी विजय समदुर याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. दोघांनीही फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक 145/2026 अन्वये कलम 118(1), 352, 115(2), 351(2), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *