
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत घेतली जातात उत्कृष्ट उपक्रम-दत्तराव पोफळे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने
मालेगाव येथील तहसील कार्यालया जवळ बोरगाव रोड वरील श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा मालेगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त शाळेमध्ये सायन्स क्विझ कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे तर प्रमुख अतिथी दत्तराव पोफळे हे होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे यांचे शाळेच्या वतीने पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल भिसडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बोलताना भारतीय वैज्ञानिक व त्यांनी केलेली कामगिरी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर प्रमुख अतिथी दत्तराव पोकळे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व त्याचा शालेय जीवनाशी असलेला सहसंबंध स्पष्ट केला. यानंतर विद्यार्थ्यांची सायन्स क्विझ(विज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धा) कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली. या सायन्स क्विझ कॉम्पिटिशन चे परीक्षण केशव इंगळे यांनी केले. व यामध्ये डॉ.एपीजे अब्दुल कलाम ग्रुप वर्ग पाचवी,सहावी,सातवी मुले यांचा प्रथम क्रमांक आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 7 वी विद्यार्थिनी कोमल कांबळे व वैष्णवी धोंगडे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन मु.अ. विठ्ठल भिसडे व गणेश इढोळे यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश इढोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
