
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ १५ मे पर्यंत आयोजन ; जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव ),
दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व देखरेखीखाली महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागाळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय शासनामार्फत घेण्यात आले आहेत. महसूल विभागामधील सदर सुधारणांचा लाभ सर्व सामान्य जनतेला करुन देणेसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान १५ मे २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे, तरी याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.दि. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिसीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्ह्यात तालुकास्तरावर मंडळ निहाय खालील प्रमाणे वेळापत्रकानुसार महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र १ राबविण्यात येणार आहे.
वाशिम तालुका : वाशिम तालुक्यात अनसिंग येथे ७ मार्च , पार्डी आसरा येथे १४ मार्च , केकतउमरा व वारला येथे १० एप्रिल , पार्डी टकमोर व कोंडाळा झामरे येथे १७ एप्रिल , वाशिम येथे ८ मे तसेच राजगाव व नागठाणा येथे १५ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
मंगरूळपीर तालुका : मंगरुळपीर तालुक्यात आसेगाव येथे ७ मार्च , धानोरा व पोटी येथे १४ मार्च , शेलू खुर्द येथे १० एप्रिल , कवठळ येथे १७ एप्रिल , मंगरुळपीर येथे ८ मे तसेच पार्डी ताड येथे १५ मे रोजी कार्यक्रम होणार आहेत.
रिसोड तालुका : रिसोड तालुक्यात मोप येथे ७ मार्च , रिठद येथे १४ मार्च , कवठा येथे २० मार्च , गोवर्धन येथे २७ मार्च , वाकद येथे १० एप्रिल , केनवड येथे १७ एप्रिल , रिसोड येथे ८ मे तसेच भरजहाँगीर येथे १५ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
कारंजा तालुका : कारंजा तालुक्यात कामरगाव येथे ७ मार्च , खेर्डा बु. येथे १४ मार्च , उंबर्डा बाजार येथे २० मार्च , येवता येथे २७ मार्च , हिवरा लाहे येथे १० एप्रिल , धनज बु. येथे १७ एप्रिल , कारंजा येथे ८ मे तसेच पोहा येथे १५ मे रोजी कार्यक्रम होणार आहेत.
मालेगाव तालुका : मालेगाव तालुक्यात करंजी येथे ७ मार्च , मेडशी येथे १४ मार्च , मुंगळा येथे २० मार्च , चांडस येथे २७ मार्च , जऊळका येथे १० एप्रिल , किन्हीराजा येथे १७ एप्रिल , मालेगाव येथे ८ मे तसेच शिरपूर येथे १५ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
मानोरा तालुका : मानोरा तालुक्यात उमरी येथे ७ मार्च , शेंदुरजना येथे १४ मार्च , कुपटा येथे १० एप्रिल , इंझोरी येथे १७ एप्रिल , मानोरा येथे ८ मे तसेच गिरोली येथे १५ मे रोजी कार्यक्रम पार पडणार आहेत.
अभियानामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रलंबित फेरफार निकाली काढणे,
७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करणे,डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप., विविध दाखले वाटप, अकृषक (एनए) तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा,नविन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती,सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुर करणे,विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप,
तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा,घरकुल पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज निकाली काढणे,
अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी,भुसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणीकमी-जास्त प्रकरणे तयार करुन गाव दप्तर अद्यावत करणे.बाबत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही करण्यात येणार आहे.तरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ मध्ये आयोजित करणेत येणाऱ्या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थी यांनी सदर शिबीरांमध्ये त्यांना आवश्यक असणाऱ्या दाखले उपलब्ध करुन घ्यावेत,असेही आवाहनही जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी केले आहे.नी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
