
एंकाबा येथे मराठी भाषा गौरव दिवस उच्छाहात साजरा
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
ता.२७ :–महाराष्ट्राचा अभिमान असलेली मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज दिनांक 27/02/ 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा एकांबा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांचा सत्कार करून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली. यावेळी मनसे मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष अतिश डहाळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत शेटे, मनसे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, मालेगाव शहरअध्यक्ष सुभाष गाभणे, तसेच एकांबा येथील सरपंच अनिल कांबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार,गवळी बबन गवळी,संतोष गवळी, माजी सरपंच नंदू भाऊ गवई, मा. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शंकरराव गवळी,सह, गावातील इतर नागरिक व शिक्षकांची उपस्थिती होती*
