
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने
डॉक्टर सी व्ही रमण यांनी प्रसिद्ध शोधनिबंध रमण इफेक्ट 28 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आला होता त्यामुळे आपण आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.स्थानिक सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत विज्ञान विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे उपप्राचार्य एस बी चव्हाण प्रमुख मार्गदर्शक ज्यांना चालते बोलते विद्यापीठ म्हणतात असे ज्येष्ठ शिक्षक व्ही एम जाधव, वाय एल कदम,एम एन वानखेडे बी व्ही देशमुख मंचावर उपस्थित होते.मंचावरील सर्व मान्यवरांनी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले व तद्वतच सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . शाळेतील काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर सी व्ही रमण व राष्ट्रीय विज्ञान दिन याविषयी प्रकाश टाकला व त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व्ही एम जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय विज्ञान दिन विषयी सखोल माहिती देताना आजच्या विद्यार्थी भविष्याचा संशोधक आहे अंधश्रद्धेचा निर्मूलन करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण समाजात राहायला पाहिजे जास्तीत जास्त शाळेतून संशोधक कसे निर्माण होतील हे शिक्षकांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून एक आगळावेगळा अस्तित्व निर्माण करायला पाहिजे.अशा पद्धतीने अमूल्य मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर सी व्ही रमण यांचा जन्म 07 नोव्हेंबर 1888 साली तिरुचिरापल्ली येथे झाला 1907 साली भौतिकशास्त्रात एम ए उच्चतम प्राविण्यसह प्राप्त करून कलकत्ता येथे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स या प्रयोगशाळेत सोळा वर्ष संशोधन केल्यावर ते 1933 मध्ये बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकी विभागाचे प्रमुख झाले 1928 साली रामन परिमाण या शोधासाठी त्यांना नोबल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला असे आलेख उदाहरणे व दाखले देऊन प्रेक्षकांना आपल्या अमोघ भाषा शैलीने मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक बि व्ही देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेनेचे ज्येष्ठ शिक्षक एम एन वानखेडे यांनी मानले. राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले. संबंधित कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.
