
आचार्य विद्यासागर जी महाराज स्मृतिदिनानिमित्त शिरपूर येथे अष्टधातू चरण पादुकांची स्थापना.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील शिरपूर जैन येथे दि.२०फेब्रुवारी रोजी “गुरूंचे चरण आणि वचन हे दुःखसागरात बुडणाऱ्या भव्य जीवासाठी पतवार (नौके) प्रमाणे असतात ज्याने जीवनात गुरूंच्या वचनांना शिरोधार्य मानून तत्त्वज्ञानाचा कोष प्राप्त केला, त्याला शांतीचा मार्ग आपोआप मिळतो,” असे प्रतिपादन मुनी श्री सिद्धांत सागर जी महाराज यांनी केले. विश्ववंदनीय आचार्य विद्यासागर जी महाराज यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरपूर जैन येथील अंतरिक्ष समवशरण परिसरात अष्टधातूपासून निर्मित भव्य चरण पादुकांची स्थापना करण्यात आली याप्रसंगी आयोजित विनयांजली सभेला संबोधित करताना एलकश्री बोलत होते अष्टधातू चरणांची शोभायात्रा आणि अनावरण या मंगलप्रसंगी आचार्य श्रींच्या अष्टधातू निर्मित चरणांची भव्य शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली ही शोभायात्रा अंतरिक्ष विद्या परिसरात पोहोचल्यानंतर आचार्य श्रींचे सामूहिक पूजन करण्यात आले. या चरणांचे अनावरण मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते झाले, तर रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी भावपूर्ण चरण अर्चना केली. स्मारक परिसरात चरण स्थापित करण्याचे भाग्य अभियंता महेंद्र जैन यांना लाभले. या विनयांजली सभेत अनिल वाळले, डॉ.रजनी (इंदूर), ब्रह्मचारिणी अनिता, ब्रह्मचारिणी पद्मा आणि संगीता यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ब्रह्मचारी विनेश मलईयाजी (इंदूर) यांनी केले.*गोसेवा संस्थान आणि आरोग्य शिबिर*या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन गोसेवा संस्थान’चे भव्य उद्घाटन पुजारी महेश जैन,सचिव आकाश महाजन आणि मुख्य अभियंता महेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच,आयोजित आयुर्वेद चिकित्सा शिबिरात प्रसिद्ध वैद्य प्रकाशचंद्र गोधा आणि त्यांच्या चमूने शेकडो रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरणाने झाली.
