जिल्हा स्तरीय संवाद बैठक संपन्न मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची पक्ष बांधणी

जिल्हा स्तरीय संवाद बैठक संपन्न मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची पक्ष बांधणी व मुंबई आझाद मैदान मोर्चाबाबत सविस्तर चर्चा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची जिल्हा स्तरीय संवाद बैठक शासकीय विश्रामगृह सभागृहात उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. बैठकीत संघटनेची आगामी भूमिका, पक्ष बांधणीची दिशा तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.सदर बैठकीला राज्य नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर, संभाजीब्रिगेट विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, अकोला जिल्हा अध्यक्ष पवन भड, वाशिम जिल्हा अध्यक्ष नितीन चगदळ, उपाध्यक्ष विठ्ठल गंगावणे सचिव प्रविण ढेंगळे, सत्यम गिरडेकर ह्यांच्या उपस्थित बैठक पार पडली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेच्या कार्याचा आढावा, इतिवृत घेण्यात आला. मागील काळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक भान यावर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. संघटनेच्या पक्ष बांधणीसंदर्भात बोलतांना राज्य नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर ह्यांनी संघटनात्मक रचना मजबूत करण्यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित करा आणि सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच युवकांच्या सहभागातून संघटना अधिक व्यापक करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.मुंबई स्थित आझाद मैदानावर होणाऱ्या आगामी मोर्चाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. मोर्च्याचा उद्देश, मागण्या आणि अपेक्षित सहभाग यावर चर्चा करतांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात युवकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. मोर्चा शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष राज्य समित्यांची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला.बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. युवकांच्या हक्कांसाठी आणि रोजगाराच्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी संघटना अधिक सक्रियपणे कार्य करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ह्या बैठकी मध्ये नवनियुक्त मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणुन हर्षल इंगळे ह्यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणुन सिद्धार्थ वैद्य ह्यांची निवड कारण्यात आली. राज्य नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर ह्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सन्मानीत करण्यात आले. ह्यावेळी माधव गिरी, सिद्दार्थ वैद्य, हर्षल इंगळे,धिरज ठाकरे, दिनेश गवई, संतोष थोरवे, योगेश राठोड, सतिश राठोड, विष्णु गावंडे, सचिन सावके, गणेश सावके, दीपाली गाढवे, दिपाली म्हातारमारे, रुपाली अस्वार, सोनाली अंबुरे, मंगला मापारी, उमेश खोरणे, भागवत अवगण, वैभव सावंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली म्हातारमारे, दिपली गाढवे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन माळेगाव तालुका सचिव गोपाल गुघे ह्यांनी केले राज्यगीताने बैठकीची सांगता करण्यात आली. ह्या वेळी सर्व तालुका अध्यक्ष तथा वाशिम जिल्ह्यातील हजारो युवा प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *